आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती

उबाळे वस्ती, फक्राबाद येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व वर्धापन दिनानिमित्त त्रिदिनी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात भावी जिल्हा परिषद सदस्य श्री आजिनाथ नाना हजारे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व श्रद्धाळूंशी संवाद साधला.  

या प्रसंगी भगवान अप्पा उबाळे  यांच्या हस्ते अजिनाथ नाना हजारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अशोक महाराज भाकरे व सखाराम महाराज जाधव (दिघोळ) यांसारखे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले व सामूहिक हरीनामाच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण निर्माण झाले.  
श्री.हजारे यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून समाजातील धार्मिक व सांस्कृतिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीने श्रद्धाळूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती