हाळगांव प्रतिनिधी:
दि. 18 रोजी आघी गाव भेट दौऱ्यावर मा. श्री. अजिनाथ नाना हजारे उपस्थित होते. या भेटीच्या वेळी आघी गावातील सर्व नागरिकांनी एकमुखाने विश्वास दिला की,
“आम्ही शिफारस करणार तर आहोतच, पण ती औपचारिकता म्हणून नाही, तर आमच्या आघी गावच्या एकजुटीची ताकद म्हणून करणार आहोत. एवढ्यावर न थांबता, मोठ्या प्रमाणात लीड देऊन विजय मिळवण्यासाठी आमचा ठोस वाटा उचलू.”
या प्रसंगी गावातील विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीला डॉ. बाळासाहेब बोराटे, भारत शेळके, अजिनाथ घुले, विकास काळे, बाप्पू काळे, उमेश इंगळे, योगेश मारकड, कल्याण शिंदे, माजी सरपंच प्रकाश शिंदे, सोसायटी संचालक बाबा शेख, आप्पासाहेब वारे, नवनाथ घुले, सुनिल शेळके, रोहित मंडलिक, संपत इंगळे, जालिंदर घुले, आण्णासाहेब इंगळे, भाऊ निंबाळकर, पद्माकर कुलकर्णी, संपत इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय कल्याण इंगळे पाटील, डॉक्टर बाळासाहेब बोराटे व आप्पासाहेब वारे यांनी सर्वांना संबोधित केले.
Tags:
जिल्हा परिषद अपडेट