स्वच्छ प्रतिमेचा वारसा, जनतेचा विश्वास घेत – धनलक्ष्मीताई हजारे यांची उमेदवारीकडे वाटचाल

 

जामखेड प्रतिनिधि:

        जामखेड तालुक्यातील राजकीय परिस्थिति बदलत आहे. जवळा गटातील जिल्हा परिषद सदस्य ही जागा ; महिला इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित सीट असल्याने धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांची उमेदवारीची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर उत्सुकता निर्माण झाली असून जनतेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

    धनलक्ष्मी हजारे यांच्या उमेदवारीचा आधार म्हणजे त्यांचे पती अजिनाथ हजारे यांची स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कामकाज आणि लोकांशी थेट संवाद. गावोगाव नागरिकांमध्ये त्यांच्यावर "आपला माणूस" अशी आस्था निर्माण झाली आहे. यामुळे स्वहिताचा  विचार न करता सार्वजनिक दृष्टिकोण लक्षात घेऊन जनता त्यांना समर्थन देण्यास तयार आहे. युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सगळे उमेदवारीसाठी जोरदार समर्थन करत आहेत. तसेच वेगवेगळ्या स्तरांमधून त्यांच्या उमेदवारीविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. 


    राजकीय विश्लेषकांच्या मते, ही उमेदवारी स्थानिक स्वराज्य संस्थांतील उमेदवाराच्या स्वच्छ प्रतिमेचे महत्त्व दाखवते. प्रामाणिक महिलांना संधी  मिळाल्यास जनतेला नवा दृष्टिकोन मिळतो. धनलक्ष्मी हजारे यांच्या उमेदवारीभोवतीचा दिसून येणारा उत्साह जनतेच्या विश्वास आणि आशांचे प्रतिबिंब आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती