सीना आणि नांदणी नदीवरील बंधारे दुरूस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांना देताना भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष आणि ज्योतीक्रांती मल्टीटेटचे चेअरमन अजिनाथ हजारे
तालुक्यातील जवळा येथील सीना नदीवरील बंधारा व नांदणी (कवतुका) नदीवरील फुटलेले बंधारे तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष आणि ज्योतीक्रांती मल्टीटेटचे चेअरमन आजीनाथ हजारे यांनी केली आहे.
याप्रश्री आजीनाथ हजारे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांना गुरूवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी भेटुन निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत प्रगतशील शेतकरी राजेंद्र महाजन, माजी उपसरपंच गौतम कोल्हे , मारूती रोडे, स्वामी गुळवे, सतिश हजारे, महेंद्र खेत्रे, संकेत हजारे उपस्थित होते.
आजीनाथ हजारे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.आशिया यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्टेबर मध्ये सीना नदी आलेल्या पुरामुळे जवळा येथील सीनावरील कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याचे साईडचे दोन्ही मातीभराव वाहुन गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. साईडचे भराव वाहून गेल्यामुळे नदीपात्रात पाणीसाठा होणार नाही. परिणामी उन्हाळयात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे जवळा येथील कोल्हापुर पध्दतीचा बंधारा तातडीने दुरूस्त करणे गरजेचे आहे.
जवळा येथे नांदणी ( कवतुका ) नदीला सप्टेबर मध्ये आलेल्या पुरामुळे जलसंधारण आणि जिल्हा परिषद पाटबंधारे विभागामार्फत सन २०१६ मध्ये झालेले १३ बंधारे फुटले आहेत. या प्रत्येक बंधा-याचे साईडचे मातीभराव वाहुन गेल्यामुळे नदीपात्रात पाणीसाठा होणार नाही. परिणामी उन्हाळयात याभागात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्र भेडसावणार आहे.
जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत सदर बंधार्याची दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आज अडीच महिण्यानंतरही काहीही कार्यवाही झाली नाही. यासंदर्भात संभाव्य पाणीटंचाई पाहता जवळा परिसरातील सदर सर्व बंधा-याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.
जवळा ग्रामस्थांचे निवेदन मिळाले असून, जलसंधारण विभागाकडील जवळा परिसरातील सर्व साठवण बंधा-याची तातडीने दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंजेवाडी लघु पाटबंधारे दुरूस्तीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
— पांडुरंग गायसमुद्रे
जिल्हा जलसंधारण अधिकारी अहिल्यानगर
जलसंपदाच्या यांत्रिकी विभागामार्फत जवळा येथील नांदणी (कवतुका) नदीवरील बंधा-यांची दुरूस्ती करण्यासाठी पोकलेन आणि टिपर उपलब्ध करून देण्यात येतील.
— प्रकाश थोरात
कार्यकारी अभियंता यांत्रिकी जलसंपदा विभाग,अहिल्यानगर