प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळा गटात भक्ती जागर; ११,१११ घरांपर्यंत ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान पोहोचले
जवळा (प्रतिनिधी):
भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जवळा जिल्हा परिषद गटात श्रद्धा, संस्कृती आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सौ. धनलक्ष्मी अजिनाथनाना हजारे यांच्या संकल्पनेतून “माझा गाव, माझे दैवत” ही मोहिम राबवली गेली असून, याअंतर्गत ११,१११ घरांमध्ये ग्रामदैवतांच्या तसेच मुस्लिम बांधवांसाठी मक्का-मदीना शरीफच्या पवित्र प्रतिमांचे वितरण करण्यात आले.
“हा उपक्रम प्रशंसनीय आणि समाजाला दिशा देणारा आहे. गावोगावी भक्तीचा आणि संस्कृतीचा जागर निर्माण झाला आहे.”
- योगिराज रणजित बापू महाराज
श्रद्धेचा सन्मान, संस्कृतीची जपणूक
जवळा गटातील विविध धार्मिक परंपरांचा सन्मान राखत शिवशक्ती परंपरा, देवी उपासना, नाथसंप्रदाय, महानुभाव, वैष्णव, हनुमत भक्ती अशा प्रवाहांतील ग्रामदैवतांच्या प्रतिमा नागरिकांच्या घराघरांत पोहोचवण्यात आल्या. तसेच मुस्लिम समाजातील निर्गुण-निराकार ईश्वर संकल्पनेचा आदर राखत मक्का-मदीना शरीफच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.
“धनलक्ष्मीताई हजारे, अच्छे कामों की शुरुआत करने की यह कोशिश मुझे बहुत पसंद आई। मैं कामना करता हूँ कि आप जो भी चाहते हैं उसमें सफल हों।”
- मौलाना इमोद्दीन याकुब कुरेशी
सर्वधर्मसमभावाचा ठळक संदेश
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रत्यक्ष दर्शन. मुस्लिम समाजातील निर्गुण-निराकार ईश्वर संकल्पना लक्षात घेऊन मुस्लिम कुटुंबांना मक्का व मदिना शरीफच्या सात्त्विक प्रतिमा भेट देण्यात आल्या. यामुळे मुस्लिम समाजात अजिनाथ नाना हजारे व धनलक्ष्मी हजारे यांच्याबद्दल आपुलकी आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
“वित्त म्हणजे धन ते कुणाकडेही असू शकते; पण चित्त महत्त्वाचे असते ते चांगल्या ठिकाणी असावे लागते. या उपक्रमात वित्त आणि चित्त यांचा सुंदर संगम दिसतो. हा प्रयत्न स्तुत्य आहे.”
- ह. भ. प. परमेश्वर राऊत
राजकीय वर्तुळातही चर्चा
पक्षपातळीवर हा उपक्रम केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता प्रभावी जनसंपर्क आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श नमुना म्हणून पाहिला जात आहे. ११,१११ घरांपर्यंत थेट पोहोचलेल्या या मोहिमेमुळे जवळा गटात धनलक्ष्मी हजारे यांची सामाजिक व राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे.
सामाजिक प्रतिक्रिया
ग्रामदैवत आणि मक्का-मदिनाच्या पवित्र प्रतिमांचे वाटप हा उपक्रम केवळ श्रद्धेला चालना देणारा नाही, तर एकता, सौहार्द आणि सांस्कृतिक सलोख्याचा ठोस संदेश देणारा ठरला आहे.
ग्रामपातळीवर लोकांच्या सहभागामुळे या उपक्रमाला अधिक व्यापकता लाभली असून, तरुण पिढीला परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधण्याची प्रेरणा मिळते. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनी मिळून या उपक्रमाला पाठिंबा दिल्याने सामाजिक सलोखा अधिक बळकट झाला आहे.
“चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या कामाने झाली. पुढे या मोहिमेचा परिणाम निश्चितच चांगला दिसेल.”
- बापूराव भोईटे महाराज
“ग्रामदेवतेविषयी प्रत्येक गावाची अस्मिता जागृत करण्यासाठी सौ. धनलक्ष्मीताई अजिनाथनाना हजारे यांचे मनःपूर्वक आभार.”
- बाळासाहेब महाराज होंगे
“ग्रामदैवत वाटपाने सुरू केलेल्या फळ त्यांना मिळावे ही देवीचरणी प्रार्थना.”
- ह. भ. प. गोविंदनाना उबाळे
“मक्का-मदीना फोटो फ्रेमची निवड सौ. धनलक्ष्मी अजिनाथनाना हजारे यांनी जागतिक दृष्टिकोनातून केली आहे. संपूर्ण मुस्लिम समाज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला गेला आणि त्यामुळे तो पूर्णपणे सार्थ ठरतो.”
- सलाबत पठाण

.png)