अजिनाथ (नाना) हजारे यांच्या प्रयत्नाना यश; जवळा परिसरात फुटलेले बंधारे दुरुस्तीला सुरुवात



    जवळा प्रतिनिधि : जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील सीना व नांदणी (कवतुका) नदीवरील फुटलेले बंधारे दुरुस्त करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रशासनाने तातडीने प्रतिसाद देत आवश्यक यंत्रसामुग्री दाखल केली असून, दुरुस्तीची कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. 
    नदीवरील बंधारे पुन्हा सक्षम करण्यासाठी मातीभराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक अभियंते व कामगारांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणावर माती, दगड व वाळूचा वापर करून बंधाऱ्यांची मजबुती केली जात आहे. पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी तात्पुरत्या संरचना उभारल्या जात आहेत, ज्यामुळे दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे पार पडू शकेल.

    स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तातडीने करण्यात आलेल्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई टळण्याची आशा निर्माण झाली असून गावात आनंदाचे वातावरण आहे.ग्रामस्थांनी सांगितले की, या उपक्रमामुळे शेतीला दिलासा मिळणार असून जनजीवन सुसह्य होईल. शेतकऱ्यांनी विशेषतः या निर्णयाचे कौतुक केले आहे.

    आजिनाथ हजारे यांच्या सामाजिक जाणीव, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुणांविषयी ग्रामस्थांनी प्रशंसा व्यक्त केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे गावात एकात्मता निर्माण झाली असून लोकांमध्ये विश्वास वाढला आहे. 

याप्रसंगी अजिनाथ (नाना) यांच्या समवेत याप्रसंगी अविनाश व  गोकुळ वाळूंजकर, महेंद्र खेत्रे, पिंटू हजारे, सतीष हजारे,  हे सर्व उपस्थित होते. 


    सध्या एक पोकलेन मशीन कार्यरत असून, लवकरच आणखी दोन पोकलेन व चार टिपर मशीन दाखल होणार आहेत. या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून आगामी हंगामात पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादाचे स्वागत केले असून, बंधारे पुन्हा सक्षम झाल्याने शेती व पाणीपुरवठा यासाठी मोठा आधार मिळणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती