अरणगाव (प्रतिनिधी):
कवडगाव (ता. जामखेड) येथे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत स्थानिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. बैठकीत सर्वांनी एकमुखाने श्री. अजिनाथ नाना हजारे यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी केली.
बैठकीच्या प्रास्ताविकात श्री. संतोष भोरे यांनी हजारे हेच उमेदवारीस सर्वाधिक पात्र असल्याचे स्पष्ट केले. गावकऱ्यांचा पाठिंबा, शिफारसी आणि आग्रह पक्षश्रेष्ठींना पोहोचविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना श्री. हजारे यांनी, “आपण दाखवलेल्या विश्वासाला मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करीन,” असे सांगून जनतेच्या अपेक्षांना प्रतिसाद देण्याची ग्वाही दिली.
बबनमामा हंगे व बाळू महाराज हांगे यांनी हजारे यांचे पक्षनिष्ठ कार्य, जनसंपर्क आणि विजयाची क्षमता अधोरेखित करत उमेदवारी त्यांनाच मिळावी अशी ठाम भूमिका मांडली. सचिन ढेपे या युवक कार्यकर्त्याने हजारे यांचे संयमी, शांत व लोकाभिमुख व्यक्तिमत्व अधोरेखित करत, “निवडणुकीत आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करू,” असे प्रतिपादन केले.
बैठकीच्या शेवटी राऊत मेजर यांनी आभार प्रदर्शन करून सभेचा समारोप केला.
या बैठकीस संतोष भोरे, राऊत मेजर, बबनराव हंगे, अशोक भोईटे, बापूसाहेब भोरे, मुरलीधर भोरे, हिम्मत भोरे, युवराज भोरे, सचिन ढेपे, शहादेव बोधे, बाळासाहेब भोरे, नारायण भोरे, दादा परहार, पोपटराव भोईटे, रावसाहेब मगर, बलभीम चोरखले, बाळू महाराज हांगे, संजय येवले, नानासाहेब आढाव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.