धानोरा गाव अजिनाथ हजारे यांच्या पाठीशी ठामपणे उभे

ग्रामपंचायत पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, युवक कार्यकर्ते आणि नागरिकांचा एकमुखी पाठिंबा; जिल्हा परिषद निवडणुकीत विजयासाठी ठोस आधार

फक्राबाद (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिनाथ हजारे यांच्या धानोरा गावातील दौऱ्याला उत्स्फूर्त आणि ठाम जनसमर्थन मिळाले, गावातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविला.

या दौऱ्यात भाऊसाहेब काळे, हरीदास शिरगिरे, बालाजी शिंदे, प्रवीण शिंदे, संजय पवार, नामदेव शिंदे, अविनाश आढाव, पप्पू तुपेरे, नितीन आढाव, हरीदास आढाव, अंकुश पवार, धोंडीबा आढाव, बारीक जगताप, बबन तुपरे, विश्वनाथ शिंदे, ठकसेन लोंढे, सुभाष वडवकर, भाऊसाहेब आढाव, सोनू लोंढे, बाळासाहेब तुपेरे या सर्वांनी चर्चमध्ये सक्रिय सहभाग घेतला. गावकऱ्यांनी एकमुखाने अजिनाथ हजारे यांच्या प्रामाणिक कार्यपद्धती, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि थेट संवादशेलीवर विश्वास व्यक्त करत संपूर्ण गाव त्यांच्या सोबत पूर्ण क्षमतेने उभा

राहणार असल्याची ग्वाही दिली. या एकजुटीमुळे धानोरा गावात निवडणुकीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अजिनाथ हजारे यांना निर्णायक समर्थन मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. गावकऱ्यांचा उत्साह आणि एकत्रितपणा हा त्यांच्या विजयासाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे, असे स्थानिक विश्वषकांचे गत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती