हळगावच्या पाठिंब्याने सौ. धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांचा उमेदवारी प्रवास बळकट

हळगाव (प्रतिनिधी) – जवळा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सौ. धनलक्ष्मी आजीनाथ हजारे यांचा उमेदवार म्हणून प्रवास हळगांव गावाचे एकमताने पाठिंबा मिळवत ठसा उमठवत आहे. भारतीय जनता पक्षाच्या संघटित नेतृत्वाखाली ग्रामीण विकास, सामाजिक एकात्मता आणि महिलांचा सशक्तीकरण हे मुद्दे ठळकपणे अधोरेखित झाले आहेत.

गावात नुकतीच एक महत्त्वपूर्ण विशेष बैठक पार पडली, ज्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ श्री. आजीनाथ हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी आणि गावातील कर्तृत्ववान कार्यकर्ते एकत्र आले. या बैठकीचा उद्देश गावाच्या सामाजिक एकतेला बळकटी देणे आणि आगामी उपक्रमांसाठी ठोस दिशा ठरवणे हा होता.

गावातील विशेष बैठकीत नेतृत्ववर्ग आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. सोमनाथ पाचरणे, माजी सरपंच श्री. दिगंबर ढवळे, विद्यमान सदस्य श्री. दगडू पुराणे, श्री. रामदास शिंदे, श्री. त्रिंबक आप्पा ढवळे आणि श्री. राम शिंदे साहेबांचे खंदे समर्थक श्री. सुनीलकाका मुरलीधर ढवळे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यकर्त्यांमध्ये , श्री. अनिल तुकाराम ढवळे, श्री. संजय काळे, श्री. हौसराव ढवळे, श्री. संदीप कापसे आणि श्री. बापूराव ढवळे यांचा उल्लेखनीय सहभाग होता. तसेच श्री. धनंजय कापसे, श्री. नवनाथ ढवळे आणि श्री. महादेवआण्णा ढवळे यांच्यासह अनेक नागरिकांनीही उपस्थित राहून बैठकीला उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्याचबरोबर डॉ. सुधीर रंधवे, लिंबू व्यापारी सुदाम कापसे, अभिमन्यु कापसे, शिवाजी शेलबा ढवळे, राजेंद्र साहेबराव ढवळे हेही उपस्थित होते.

या बैठकीत गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. उपस्थित सदस्यांनी पारदर्शक कार्यपद्धती, सामाजिक समावेश आणि ग्रामहितासाठी एकसंघ भूमिका घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे खास क्षण


मा. सरपंच दिगंबर ढवळे, भारतीय जनता पक्ष तालुका उपाध्यक्ष नवनाथ ढवळे व द विनफीन गुरुकुलम हाळगांवचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनीही अनौपचारिक गप्पांमधून पाठिंबा दर्शविला.

गावात आरोग्य, शिक्षण, महिलांची बचतगट, युवकांसाठी रोजगार, शेतकऱ्यांना प्रशिक्षण अशा सामाजिक व ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची रणनिती हजारे यांच्या नेतृत्वात मजबूतपणे राबवली जात आहे. “जनतेसाठी सत्ता, जनसंपर्कातून विकास” या भूमिकेवर त्यांचा विश्वास असून, कार्यकर्त्यांचा एकजूट पाठिंबा त्यांना अधिक मजबूत करत आहे.

हळगांव गावाची साथ आणि कार्यकर्त्यांची एकता ही सौ. धनलक्ष्मी हजारे यांच्या विजयासाठी संघटित पायाभूत शक्ती ठरू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती