वंजारवाडी ग्रामस्थांचा निर्धार - धनलक्ष्मी हजारे यांना निवडणुकीमध्ये आधार

 

फक्राबाद (प्रतिनिधी): वंजारवाडी येथील ज्येष्ठ नेते शाहूराव जायभाय, रामकिसन जायभाय, गणेश जायभाय आणि बबनदादा रावसाहेब जायभाय यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीच्या सुरुवातीला वंजारवाडी ग्रामस्थांच्या वतीने पक्षश्रेष्ठी प्रा. राम शिंदे साहेब यांच्याकडे सौ. धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही शिफारस करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.

 यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी सौ. हजारे यांना उमेदवारी मिळाल्यास पक्षाच्या उमेदवार म्हणून पूर्ण क्षमतेने साथ देण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी येणाऱ्या निवडणुकीत सौ. हजारे यांना वंजारवाडी येथून भक्कम बहुमत देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या समन्वयाने संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.या बैठकीस मोतीलाल जायभाय, कांतीलाल जायभाय, गंगाराम भिसे, रामा फुंदे, विजय जायभाय, बबन फुंदे, शंकर ओंबासे, अक्रूर नागवडे, आजिनाथ जायभाय, बबन जायभाय, गणेश फुंदे, विशाल डोळे, बाळासाहेब जायभाय, रवींद्र गोसावी आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीदरम्यान भाजपा ज्येष्ठ नेते शाहूराव जायभाय यांनी वंजारवाडी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने, तर रामकिसन जायभाय यांनी ग्रामस्थांच्या वतीने सौ. हजारे यांना गावातून भक्कम बहुमत मिळवून देण्याची जबाबदारी स्विकारली.या निर्णयानंतर सौ. धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांच्या जिल्हा परिषद उमेदवारीसाठी चर्चा भाजप वर्तुळात अधिक वेगाने पुढे सरकली असून वंजारवाडी परिसरातील ठोस पाठिंब्यामुळे त्यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक बळकट झाल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

आजिनाथ नाना हजारे यांची फक्राबाद येथे उपस्थिती